VIDEO : राज ठाकरेंच्या जातीवादाच्या टीकेवर शरद पवारांनी पहिल्यांदाच सोडले मौन, म्हणाले - शदर पवार
मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व राज ठाकरे यांच्यावर चांगलाच निशाणा साधला. विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या मुद्द्यावरुन शरद पवार यांनी म्हटले की, मी राज्यपालांचं विधान ऐकलं. ते म्हणाले सरकार मागणी करत नाही तर तुम्ही का विचारताय. पण पत्र गेलेलं आहे, वाढत्या वयामुळे त्यांच्या लक्षात आलं नसेल, असा टोला शरद पवार यांनी राज्यपालांना लगावला आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतरच जातीवादाचा मुद्दा प्रखरतेने समोर आला असं मत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी एका कार्यक्रमात मांडले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज ठाकरेंच्या टीकेवर मौन सोडलं आहे. पवार म्हणाले मला त्याविषयी काही बोलायचे नाही. परंतु राज ठाकरेंना माझा सल्ला आहे की, प्रबोधनकारांचे लिखाण वाचा, प्रबोधनकारांचे लिखाण नक्कीच त्यांना योग्य रस्ता दाखवेल अशी मला खात्री आहे.