केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांचा तात्काळ राजीनामा घ्या! - नवाब मलिकांची मागणी - NCP agitation in Mumbai
मुंबई - लखीमपूर घटनेवरून महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. राज्यभरात विविध ठिकाणी निदर्शने, आंदोलन आणि निषेध करण्यात आला. तसेच केंद्रीय मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती. राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुंबईत निषेध करण्यात आला. यावेळी अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधीने नवाब मलिक यांच्याशी बातचीत केली.