NCB Raid : एनसीबीची नांदेडमध्ये मोठी कारवाई, शेकडो किलो ड्रग्ज जप्त - Nanded
मुंबई - नांदेडमधील कामठा परिसरातील एका कारखान्यावर अमली पदार्थ नियंत्रण पथकाने (NCB) छापेमारी केली आहे. यामध्ये 111 किलो ओपीएम पॉपी जप्त करण्यात आले असून यापासून हेरॉईन (drugs) बनवले जाते, अशी माहिती मुंबईचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. या प्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले असून आणखी दोघांचा शोध सुरू असल्याचेही वानखेडे यांनी सांगितले. ही कारवाई सोमवारी (दि. 22) दुपारी करण्यात आली आहे. या ठिकाणाहून सुमारे दीड लाखाची रोकड, पैसे मोजण्याचे यंत्रही जप्त करण्यात आले आहे.