'मुख्यमंत्री साहेब विदर्भात या; येथील पूरस्थितीचीही पाहणी करा; खासदार नवनीत राणांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी - नवनीत राणा ताज्या बातम्या
अमरावती - अमरावती जिल्ह्यात आठवडाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील विविध भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. खासदार नवनीत राणा यांनी आज भातकुली, चांदूरबाजार या भागात पावसामुळे नुकसान झालेल्या भेट दिली. विशेष म्हणजे रस्त्यावरचा चिखल तुडवीत खासदार नवनीत राणा यांनी संकटग्रस्त ग्रामस्थांना भेटून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली. 'पंढरपूरला स्वतः कार चालवत जाणाऱ्या मुख्यमंत्र्यांना विदर्भातही कार चालवत येत येऊ शकते.', असा खोचक टोला त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. तसेच मुख्यमंत्र्यांनी विदर्भात येऊन पुराची पाहणी करावी', अशी मागणी खासदार नवनीत राणा यांनी केली.