सावधान..! अनोळख्या महिलेची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारताय, आधी पाहा 'हा' व्हिडिओ
नाशिक - पाकिस्तान हेरगिरी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात हनी ट्रॅपचा वापर करत आहे. यात सोशल मीडियावरून अनोळखी महिला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवते. त्यानंतर काही दिवस तुम्हाला आवडतील, अशा गोष्टी तुमच्या सोबत बोलते. नंतर तुमच्या भागातील संवेदनशील माहिती सांगण्यास किंवा पाठवण्यास सांगते. आपण या महिलेच्या जाळ्यात अडकलो आणि भारतीय सुरक्षेच्या संवेदनशील माहिती महिलेला दिली तर आपल्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होतो. त्यामुळे अनोळखी महिलेची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका, असे आवाहन पोलीस नाशिकचे पोलीस आयुक्त पांडे यांनी केले आहे.