VIDEO : विजय दिवस - कारगिल युद्ध स्मारक येथे संगीत समारंभाचे आयोजन - kargil vijay diwas musical ceremony 2021
कारगिल (लडाख) - आज 26 जुलै म्हणजेच कारगिल विजय दिवस आहे. 26 जुलै 1999मध्ये भारताने पाकिस्तानविरुद्ध कारगिलचे युद्ध जिंकले होते. या युद्धाला भारताने ऑपरेशन विजय असे नाव दिले होते. तेव्हापासून 26 जुलै हा दिवस कारगिल युद्धात सहभागी झालेल्या जवानांविषयी अभिमान पुन्हा जागृत करण्यासाठी कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर काल (रविवारी) 25 जुलैला कारगिल विजय स्मारक येथे संगित समारोहाचे आयोजन केले गेले होते. पाहुयात, या संगीत समारोहाची चित्रफित...