लोकशाहीच्या चार स्तंभावर शंका निर्माण करणारे वर्तन देशात सुरू आहे - खासदार सावंत - लोकशाही
अकोला - परमबीर सिंग यांच्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर शिवसेनेचे नेते खासदार अरविंद सावंत यांनी ताशेरे ओढले. ते अकोल्यात सेनेचे आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या निवासस्थानी बोलत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या घटनेमध्ये त्यांना काय अभिप्रेत होते आणि खरंच तसे घडते का, असे जेव्हा विचारतो तेव्हा लक्षात देशांमधील लोकशाहीचे चार स्तंभ सध्या कितपत मजबुतीने उभे आहेत, अशी शंका वाटावी, असे सगळे वर्तन देशामध्ये सुरू आहे, असा आरोप त्यांनी केला. काय म्हणाले खासदार सावंत पाहा सविस्तर व्हिडिओ...