महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Ganeshotsav 2021 : मंत्री छगन भुजबळ यांनी घेतले माजगाव येथील बाप्पाचे पहिले दर्शन - छगन भुजबळ यांनी घेतले माजगाव येथील बापाचे पहिले दर्शन

By

Published : Sep 10, 2021, 3:52 PM IST

Updated : Sep 11, 2021, 4:09 PM IST

मुंबई - मंंत्री छगन भुजबळ यांनी अंजीरवाडी माजगाव येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पाचे पहिल्या दिवशी दर्शन घेतले. 1990 पासून हे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गणेशोत्सव साजरा करत आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते पहिल्यांदा या गणेशोत्सव मंडळात बाप्पाची प्रतिष्ठापना झाली होती. शेजारच्याच वाडीत मी लहानाचा मोठा झालो. सुमारे चाळीस बेचाळीस वर्ष या मंडळात अध्यक्ष, सेक्रेटरी म्हणून जबाबदारी सांभाळली. तिथल्या लोकांनीच मला पहिल्यांदा महानगरपालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून दिले. त्यामुळे दरवर्षी या बाप्पाच्या प्रतिष्ठापना आणि विसर्जनाला भुजबळ कुटुंबीय तिकडे येत असते. जेव्हा तुरुंगात असताना दोन वर्ष इथे यायला जमले नाही. बापाने कोरोनाचे संकट दूर करावे. प्रत्येकाला निरोगी मन आणि निरोगी शरीर द्यावे, अशी मागणी छगन भुजबळ यांनी बापाकडे केली आहे.
Last Updated : Sep 11, 2021, 4:09 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details