पुणे : परिवहन मंत्री अनिल परब मंत्र्यांकडून मेट्रोच्या कामाची पाहणी; 2022 पर्यंत काम पूर्ण होणार असल्याचं आश्वासन - अनिल परब पुणे
पुणे : परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज (शुक्रवारी) पुण्यातील शिवाजीनगर येथील मेट्रोच्या कामाची पाहणी केली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, महामेट्रो आणि एमएसआरडीसी यांचा जॉईंट व्हेंचर प्रोजेक्ट होता. त्याला लागूनच राज्य महामार्ग परिवहन महामंडळाची जागा आहे. लोकांच्या सोयीसाठी एकत्रच सुविधा देण्याचा विचार आहे. अद्ययावत मेट्रो, रेल्वे आणि एसटी जवळ जवळ असतील. वेगवेगळा भुयारी रस्ता त्यासाठी करत आहोत. एकाच ठिकाणी सुविधा देण्याचा विचार असून जुलै 2022पर्यंत सगळी काम पूर्ण होईल, अशी माहिती त्यांनी दिली. पाहूयात, ते काय म्हणाले,