मृत्यू प्रमाणपत्र न दिल्याने राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची अधिकाऱ्यांना तंबी; पाहा VIDEO - not issuing death certificates
औरंगाबाद - राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील शिवना नदीला आलेल्या महापुराची पाहणी करण्यास आले होते. लासूर स्टेशन येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संभाजी डोणगावकर यांचे निधन होऊन पाच महिने झाले होते, तरीसुद्धा मृत्यू प्रमाणपत्र दिले नसल्याची बाब नातेवाईकांनी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या निदर्शनास आणून दिली. आपल्या बोलण्याने नेहमी चर्चेत असणारे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी अधिकाऱ्यांना तंबी देऊन निलंबनाच्या कारवाईचा इशारा दिला आहे. संध्याकाळपर्यत मृत्यू प्रमाणपत्र द्या, नाहीतर निलंबनाची कारवाई केली जाईल, असा इशारा मंत्री सत्तार यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे.