माटुंगा लेबर कॅम्प ते रशिया; असे घडले कॉम्रेड अण्णाभाऊ साठे
ठाणे - अण्णाभाऊ साठे शाहीर, कथाकार, कादंबरीकार, नाटककार, कलाकार, वादक असे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. त्यांचा जीवन प्रवास हा अतिशय खडतर होता. १९३२-३३ सुमारास मुंबईत आले. वयाच्या १२-१३व्या वर्षी मुंबईत आले. याच वयात त्यांनी मिलमध्ये काम करण्यास सुरुवात केली. माटुंगा लेबर कॅम्पमध्ये ते राहायला होते. अतिशय गलिच्छ, दुर्गंधयुक्त वातावरण असलेल्या वस्तीत ते राहात होते. तिथेच त्यांनी पहिले गीत लिहिले. अण्णाभाऊंनी दुसरा पोवाडा हा स्पेनवर लिहिला होता. आण्णा मुंबई कामगार, मशालसारखे वृत्तपत्र वाचायचे. त्या माध्यमातून त्यांना आंतरराष्ट्रीय जगतातील घडामोडींबद्दल माहिती होत होती. त्याकाळात स्पेनमध्ये फॅसिस्ट राज्यकर्त्यांविरुद्ध लढा सुरु होता. दुसऱ्या महायुद्धादरम्यान, हिटलरने सोवियत युनियनवर हिटलरने हल्ला केला केला होता. या पार्श्वभूमीवर त्यांनी त्यांचा स्टॅलिनचा पोवाडा लिहला. तो पोवाडाही खूप गाजला. या पोवाड्यातून त्यांचे नाव सर्वत्र झाले. गिरण्यांच्या गेटवर ते गात होते. कम्युनिस्ट पक्षाच्या मुखपत्रातून त्यांच्या कथा प्रसिद्ध होत होत्या. असा अण्णाभाऊंचा प्रवास सुरु झाला आणि तो रशियापर्यंत पोहोचला होता, असे प्रतिपादन विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे माजी सरचिटणीस सुबोध मोरे यांनी केले. अण्णाभाऊ यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने ईटीव्ही भारतने त्यांच्या संवाद साधला. पाहूयात, ते काय म्हणाले...