बुलडाणा : वीर जवान कैलास पवार अनंतात विलीन, साश्रू नयनांनी चिखलीकरांनी दिला अखेरचा निरोप - महार रेजिमेंट बातमी
बुलडाणा - महार रेजिमेंटचे जवान कैलास भारत पवार हे सियाचीन येथे आपले कर्तव्य बजावताना असताना बर्फाळ डोंगरावरुन पाय घसरुन पडल्याने त्यांना वीरमरण आले होते. ते मुळचे बुलडाणा जिल्ह्यातील चिखली येथील रहिवासी होते. बुधवारी (दि. 4 ऑगस्ट) चिखली शहरातील तालुका क्रिडा संकुलच्या प्रांगणात त्यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी भारत माता की जय.., अमर रहे अमर रहे वीर जवान कैलास पवार अमर रहे.., वंदे मातरम्... अशा गगनभेदी घोषणा देण्यात आल्या