Pollution Rate In Pune - पुणे शहराची फुफ्फुसे मोजणारं प्रदूषण!, पहा ईटीव्ही भारतचा खास रिपोर्ट - पुणे शहराची फुफ्फुसे मोजणार प्रदूषण
पुणे - शहर वायू प्रदूषणामध्ये देशांमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. शहराची लोकसंख्या वाढत असताना वाहनांची देखील (Pollution Rate In Pune) संख्या वाढल्याने वाहनातून निघणारा सूक्ष्म व अतिसूक्ष्म धूलिकण यामुळे शहराची हवा प्रदूषित झाली आहे. याची दखल घेत पुणे महानगरपालिका व परिसर या पर्यावरण रक्षणासाठी काम करणाऱ्या संस्थेने हवेची गुणवत्ता तपासणारे आणि शहराच्या प्रदूषण मोजणारे फुप्फुस जंगली महाराज रोड वरील छत्रपती संभाजी उद्यान समोर लावले आहे. या फुप्फुसाच्या माध्यमातून समाजामध्ये वायू प्रदूषणाबाबत जागृकता निर्माण होईल अशी अपेक्षा आहे. फुप्फुसाची भव्य प्रतिकृती पांढरा फिल्टर पासून बनवली आहे. आणि त्याच्यामागच्या बाजूला पंखे जोडण्यात आले आहे. ज्या प्रकारे आपल्या शरीरात हवा फुप्फुसाद्वारे घेतली जाते तशीच प्रतिकृतीमध्ये रचना केलेली आहे. यातून हवेचे गुणवत्ता निर्देशांक दाखवणारे डिजिटल मॉनिटर या प्रतिकृती सोबत लावण्यात आलेले आहे. हवा प्रदूषणामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होत असतात उच्च रक्तदाब, हृदयाचे आजार नैराश्य, चिडचिड आदी व्याधींना यामुळे आमंत्रण मिळते.