Love Couple Beaten by Mob : कन्नड घाटात प्रेमी युगलाला मारहाण; पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू
जळगाव - जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील कन्नड घाट परिसरात एका तरुण आणि तरुणीला तीन तरुण बेदम मारहाण ( love couple beaten by mob ) करीत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल ( Jalgaon Social Media Viral video ) झाला आहे. ही चार दिवसापूर्वी घटना घडली असल्याची सुत्राची माहिती आहे. या घटनेसंदर्भात पोलिसात अद्यापपर्यंत कोणतीही तक्रार दाखल ( couple beaten in Jalgaons Kannad Ghat ) झालेली नाही. पोलीस या घटनेतील मारहाण करणाऱ्या तरुणांचा शोध घेत आहेत. योग्य ती कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे यांनी ( Jalgaon SP Pravin Munde ) सांगितले.