Video- पंचगंगा नदीची धोक्याच्या पातळीकडे वाटचाल, पाहा काय आहे जिल्ह्यातील पूरस्थिती - कोल्हापूर पूरस्थिती
गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोल्हापुरातील पंचगंगा नदीने (kolhapur panchganga river) यावर्षी पहिल्यांदाच इशारा पातळी ओलांडली आहे. गेल्या बारा तासांपासून कोल्हापुरात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत चालली आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास पंचगंगा नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता आहे. सध्याची पाणी पातळी 39 फूट इतकी आहे. धोका पातळी 43 फूट इतकी आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. काही गावातील लोकांना स्थलांतर करण्याच्या सूचनासुद्धा प्रशासनाने दिल्या आहेत.