भांडुप : किरीट सोमैयांचे महावितरण कार्यालयाबाहेर वाढीव वीज बिलाविरोधात आंदोलन - मुंबई भांडुप वीज बिल आंदोलन न्यूज
भांडुप (मुंबई) - भांडुपमध्ये महावितरण कार्यालयाबाहेर भाजप कार्यकर्त्यांनी आज राज्य सरकारच्या विरोधात निदर्शने केली. भाजप नेते किरीट सोमैयाही आंदोलनात सहभागी झाले होते. 'वाढीव वीज बिले कमी करा', अशी मागणी करत भाजप कार्यकर्त्यांनी महावितरण कार्यालयाला टाळे ठोकण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी भाजप नेते किरीट सोमैया यांच्यासोबत कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेतले.