महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

जगबुडीने ओलांडली धोक्याची पातळी, बहीरवली, सुसेरी यासह खाडीपट्टयातील १५ गावांकडे जाणारी वाहतूक ठप्प - ratnagiri heavy rain news

By

Published : Jun 17, 2021, 1:53 PM IST

Updated : Jun 17, 2021, 3:28 PM IST

रत्नागिरी जिल्ह्यात सह्याद्रीच्या पट्ट्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे खेड तालुक्यातील जगबुडी, नारंगी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. जगबुडीची धोक्याची पातळी 6 मीटर आहे. मात्र आज (गुरूवारी) सकाळी जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. सध्या जगबुडी नदीची पाणीपातळी 6.75 मीटर एवढी आहे. त्यामुळे प्रशासनही सतर्क झाले आहे. बहीरवली, सुसेरी यासह खाडीपट्टयातील १५ गावाकडे जाणाऱ्या या रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक ठप्प आहे. तर चिपळूणमध्ये वाशिष्ठी नदीला पूर आल्याने पाणी शहरातील बाजारपेठेत घुसले आहे.
Last Updated : Jun 17, 2021, 3:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details