VIDEO: मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळेंच्या कुटुंबीयांनी सांगितल्या बालपणीच्या आठवणी - हेमंत नगराळे कोण आहेत
नागपूर - हेमंत नामदेवराव नगराळे हे नाव आज राज्यातील प्रत्येकाला परिचयाचे झाले आहे. कारण ही तसेच आहे. हेमंत नगराळे यांच्याकडे मुंबई पोलीस दलाचे प्रमुख म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. हेमंत नगराळे हे चंद्रपूर आणि नागपूरच्या मातीत घडले असल्याने त्यांना मिळालेल्या जबाबदारीमुळे नागपूर, चंद्रपूरसह संपूर्ण विदर्भाचा मान वाढला आहे. हेमंत नगराळे यांची मुंबई पोलीस दलाचे आयुक्त म्हणून नियुक्ती झाल्याने त्यांच्या नागपुरातील निवासस्थानी आनंदाचे वातावरण आहे. त्यांनी केलेल्या मेहनतीचे फळ आज त्यांना मिळाल्याची प्रतिक्रिया त्यांचे ज्येष्ठ बंधू दिलीप नगराळे यांनी ईटीव्ही भारतकडे बोलून दाखवली आहे. दिलीप नगराळे कुटुंबीयांशी आमचे प्रतिनिधी धनंजय टिपले यांनी खास बातचीत करून हेमंत नगराळे यांचा आजवरचा प्रवास जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
Last Updated : Mar 18, 2021, 7:06 PM IST