महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 20, 2020, 6:08 PM IST

ETV Bharat / videos

#२०२०ND: लघुग्रहापासून पृथ्वीला धोका? जाणून घ्या विशेष मुलाखतीतून...

2020 एनडी हा लघुग्रह 24 जुलैपर्यंत पृथ्वीच्या कक्षेजवळून जाणार आहे. मागील अनेक वर्षांपासून पृथ्वीच्या एवढ्या जवळून कोणताही लघुग्रह गेला नव्हता. येणाऱ्या काळात अशा लघुग्रहांनी पृथ्वीच्या अंतराळातील अस्तित्वाला धोका पोहोचू शकतो. यामुळे जगभरातील अवकाश आणि अंतराळ संस्थांकडून अशा लघुग्रहांना पृथ्वीपासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सध्या 2020 एनडी लघुग्रह पृथ्वीच्या जवळून जाताना स्पष्ट पाहता येणार आहे. त्याचा वातावरणाशी असणारा संबंध, अंतराळातील स्थान तसेच अन्य घटकांबाबत नेहरू तारांगणचे संचालक अरविंद परांजपे यांची 'ईटीव्ही भारत'ने घेतलेली विशेष मुलाखत.

ABOUT THE AUTHOR

...view details