कोरोना मीटर : महाराष्ट्रात सर्वाधिक, त्यापाठोपाठ दिल्ली; जाणून घ्या 'कसा' वाढला कोरोनाग्रस्तांचा आकडा
कोरोना विषाणूने चीनमध्ये थैमान घातले. तेथून हा विषाणू जगभरात पसरला. त्यात भारतही सुटला नाही, देशात ३० जानेवारीला केरळमध्ये पहिला कोरोनाचा रुग्ण आढळून आला. त्यानंतर कोरोनाने हळू-हळू पाय पसरायला सुरुवात केली. जवळपास पावणेतीन महिन्यामध्ये देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा १८ हजारांच्यावर पोहोचला आहे. त्यातच महाराष्ट्र आघाडीवर असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. यासंबंधी ईटीव्ही भारतचा हा विशेष रिपोर्ट...