'लोकल टू व्होकल'ला सोलापुरातून उदंड प्रतिसाद; स्थानिक पणत्या खरेदीसाठी प्राधान्य - Special News from Solapur
सोलापूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्होकल फॉर लोकल, असे आवाहन करत स्वदेशी वस्तू वापरण्याचा नारा दिला होता. दिवाळी, दसरा आदी सणाला खरेदीसाठी स्वदेशी वस्तूच खरेदी करा, असे आवाहन केले होते. पंतप्रधानांच्या या आवाहनाला सोलापूरकरांनी उदंड प्रतिसाद दिला असून पणत्या खरेदीसाठी सोलापूरकरांनी स्थानिक पणत्या खरेदीवर भर दिला आहे. सोलापूरच्या या पणत्यांची विक्री फक्त सोलापुरातच नव्हे तर महाराष्ट्रातील लातूर, उस्मानाबाद, सांगलीसह कर्नाटक राज्यातील इतर जिल्ह्यातही होत आहे.
Last Updated : Nov 4, 2021, 4:11 PM IST