यवतमाळ : कोरोनाच्या सावटाखाली पाल्यांना शाळेत पाठवायचे कसे? - यवतमाळ कोरोना बातम्या
यवतमाळ - राज्यात अनलॉक झाल्यानंतर शाळा, महाविद्यालय टप्प्याटप्प्याने उघडण्यात आल्या. शाळेमध्ये सर्व खबरदारी घेण्यात आली. मात्र, आता त्याचा काहीही फायदा झाला नसल्याचे चित्र आहे. कारण अनेक शाळांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात अद्याप विद्यार्थी पॉझिटीव्ह आढळले नसले, तरी या कोरोनाच्या सावटाखाली पाल्यांना शाळेत पाठवायचे कसे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.