VIDEO : देवेंद्र फडणवीसांच्या आरोपांना राजेश टोपेंचे प्रत्युत्तर.. म्हणाले त्यांना 'हे' माहीत आहे - आरोग्य विभागातील परीक्षा रद्द
राज्यातील आरोग्य विभागाच्या परीक्षा ऐनवेळी रद्द करण्याची घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली. त्यानंतर आज दिवसभर परिक्षार्थींमध्ये गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले. दरम्यान विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या परीक्षा प्रक्रियेमध्ये दलाल शिरले असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. या आरोपांना उत्तर देताना राजेश टोपे म्हणाले, की परीक्षा पारदर्शकपणे होण्यासाठी मी किती प्रयत्न केलेत आणि किती मेहनत घेतली आहे, हे फडणवीस यांना माहीत आहे. मात्र प्रत्येक परीक्षेत काही प्रवृत्त्या असे वाईट काम करत असतात, असंही टोपे यांनी म्हटलंय. मात्र येणाऱ्या ८-१० दिवसांत परीक्षा पारदर्शकपणे घेतल्या जाणार असून परीक्षा रद्द करण्याचा निर्णय हा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विश्वासात घेऊन एकत्रितपणे घेण्यात आल्याचे टोपे म्हणाले.