पुणे : 'मराठा क्रांती मोर्चा'चे प्रमुख आबा पाटील यांना पोलिसांनी घेतले ताब्यात - sarthi meeting in pune
🎬 Watch Now: Feature Video
पिंपरी-चिंचवड - आज सायंकाळी 7 वाजेच्या दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सारथीची बैठक पार पडणार आहे. यावेळी गोंधळ होऊ नये म्हणून 'मराठा क्रांती मोर्चा'चे प्रमुख आबा पाटील आणि बाळासाहेब हंगारगे या दोघांना भोसरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, पुण्यातील विधानभवन परिसरात सायंकाळी सारथीची बैठक पार पडणार आहे. ही बैठक सर्वसमावेशक व्हायला हवी. मात्र, आम्हाला बैठकीला टाळण्यात आले आहे. हे योग्य नाही, असे आबा पाटलांचे म्हणणे आहे.