गडचिरोली महापूर : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच मदत मिळवून देणार - एकनाथ शिंदे - एकनाथ शिंदे गडचिरोली दौरा
गडचिरोली - जिल्ह्यातील पूरस्थितीमुळे शेकडो एकर शेती पाण्याखाली गेली आहे. पुरामुळे भातपीक, सोयाबीन, कापूस आदी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पूर ओसरताच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे नगरविकास तथा गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. त्यांच्यासोबत अधिक संवाद साधला आमचे प्रतिनिधी मंगेश भांडेकर यांनी...