'राज्यपालांना कंगणाला भेटायला वेळ, पण शेतकऱ्यांना भेटायला वेळ नाही' - शरद पवारांची राज्यपालांवर टीका
मुंबई - राज्यापालांना कंगणाला भेटायला वेळ आहे, पण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या शेतकऱ्यांना भेटायला वेळ नाही, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर केली. ते आझाद मैदानात आयोजित शेतकरी मोर्चाल्या संबोधित करत होते. यावेळी त्यांनी केंद्र सरकारचा निषेध करत शेतकऱ्यांनी केंद्र सरकारला धडा शिकवायला हवा, असे आवाहन त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांना केले.