ईटीव्ही भारत विशेष : मायबाप सरकार कंगना, रिया प्रकरणांबरोबरच 'आमच्या' प्रश्नांकडे लक्ष द्याल काय? - सरकारकडून वास्तववादी प्रश्नांना बगल
मुंबई - गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येचा तपास आणि त्यानंतर अभिनेत्री कंगना रणाौत विरूद्ध शिवसेना वाद यावर राजकीय सामना रंगला आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांच्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. मात्र, कोरोनाच्या या बिकट काळात सामान्य माणसांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत आहे. यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सामान्य माणसाला कोरोनाचा वाढता प्रसार आणि लॉकडाऊनमुळे त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मूलभूत आणि वास्तववादी प्रश्नांपेक्षा माध्यमांवरही दुसऱ्याच गोष्टींवर चर्चा झडत असल्यावरून सर्वसामान्य नागरिकांमध्ये नाराजी आहे. मुंबईकर सामान्य नागरिकांच्या काय समस्या आहेत? आणि कसे जगताय सध्या सामान्य मुंबईकर याविषयी 'ईटीव्ही भारत'चा हा ग्राउंड रिपोर्ट...