Video : कोल्हापुरातील गणेश भक्ताची देखाव्याद्वारे मराठा आरक्षणाची मागणी - मराठा आरक्षण कोल्हापूर
दरवर्षी प्रत्येकजण गणेशोत्सवाची आतुरतेने वाट पाहत असतात. गणेशोत्सवात विविध प्रकारची आरास करायची लगबग प्रत्येकाच्या घरी पाहायला मिळत असते. काहीजण सामाजिक संदेश देत असतात. तर काहीजण विविध मंदिर आणि ऐतिहासिक स्थळांची माहिती देणारे देखावे बनवतात. मात्र कोल्हापुरात एक असा गणेशभक्त आहे जो गेल्या दोन वर्षांपासून आपल्या घरातील देखाव्याद्वारे मराठा आरक्षणाची मागणी करत आहे. शिवाय जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत अशाच पद्धतीने देखाव्याद्वारे आपण मराठा आरक्षणाची मागणी करत राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. शाहुपुरी स्टेशन रोड परिसरात राहणाऱ्या दिपक चौगले यांनी देखाव्याद्वारे ही मागणी केली आहे. सध्या त्यांच्या या देखाव्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे.