राज्यातील लॉकडाऊन वाढवण्यामागे महाविकास आघाडीत वेगवेगळी मतं असण्याची शक्यता - पृथ्वीराज चव्हाण मुलाखत
सध्या महाविकास आघाडीतील नेते एकमेकांवर जाहीर टीका करत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी 'ईटीव्ही भारत'शी संवाद साधला. विविध विचार आणि धोरणांवर तोडगा काढण्यासाठी चर्चेचा मार्ग सर्वांना खुला असून पक्षातील काही नेते प्रसिद्धीच्या ओघात अशा प्रकारची वक्तव्ये करत आहेत, असे स्पष्टिकरण त्यांनी दिले.