2020-21अर्थसंकल्प: पाहा पुणतांब्यातील शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 2020-21 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. रोजगार निर्मिती, मंदी, शेती या सगळ्याचे सावट देशावर आहे. ढासळलेल्या अर्थव्यवस्थेवरुन विरोधक सातत्याने निशाणा साधत आहेत. ही सगळी आव्हाने पेलत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या आज अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यासंर्भात पुणतांब्यातील शेतकऱ्यांना काय वाटते याचा आढावा ईटीव्हीने घेतला आहे.