'हालहवाल कोरोना' : अमरावती जिल्ह्यातील कोरोनास्थितीचा सविस्तर आढावा, पाहा एका क्लिकवर... - amravati district corona update
अमरावती - राज्यात ३१ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला असून राज्य सरकारने लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यासाठी नवीन नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार आता राज्यात केवळ दोनच झोन करण्यात आले आहेत. यात रेड झोन आणि नॉन रेड झोन असणार आहे. अमरावतीचा समावेश रेड झोनमध्ये आहे. अमरावतीत कोरोनाचा पहिला रुग्ण ३ एप्रिल रोजी आढळून आला. यानंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. आजघडीपर्यंत कोरोनामुळे जिह्यात १४ जणांचा बळी गेला आहे. 'ईटीव्ही भारत'ने अमरावती जिल्ह्यातील परिस्थितीचा सविस्तर आढावा आपल्या 'हालहवाल कोरोना' या विशेष मालिकेत घेतला आहे. पाहा हा विशेष वृत्तांत...