मुंबई : गगचुंबी इमारती; मात्र, अग्निसुरक्षेचा अभाव... पाहा, ईटीव्ही भारतचा रिपोर्ट
मुंबई - येथे गगनचुंबी इमारतींमध्ये वाढ होत आहे. मात्र, तेच या इमारतींमध्ये अग्निसुरक्षेचा अभाव पाहायला मिळत आहे. यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. मुंबई मनपाचे माजी सहाय्यक आयुक्त आदे शेरोडकर म्हणतात की, त्यांनी अग्निसुरक्षा कायद्यांकडे दुर्लक्ष करून रहिवाशांच्या जिवाशी आणि मालमत्तेशी खेळण्यास भाग पाडल्याबद्दल अनेक बांधकाम व्यावसायिकांवर कारवाई केली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या कारवाईनंतरही बिल्डर पुन्हा रहिवाशांच्या सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करताना दिसत आहेत. बिल्डर रहिवाशांच्या मजबुरीचा गैरफायदा घेतात. पाहा, याबाबत ईटीव्ही भारतचा हा रिपोर्ट...