Nitin Raut On Hedgewar : सरसंघचालक हेडगेवारांनी सुभाषचंद्र बोस यांच्या सचिवाला भेट नाकारली होती; ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांचा दावा - जंगल सत्याग्रह
यवतमाळ : स्वातंत्रपूर्व काळात नाशिक येथे सरसंघचालक हेडगेवार ( Sarsanghchalak Keshav Baliram Hedgewar ) हे मुक्कामी होते. नेताजी सुभाषचंद्र बोस ( Netaji Subhash Chandra Bose ) यांनी भेटीच्या निमित्ताने आपल्या खासगी सचिवाला त्यांच्याकडे पाठवले. मात्र, हेडगेवार यांनी ब्रिटिश आपल्याला अटक करतील, या भीतीने भेट नाकारली होती, असा दावा ऊर्जामंत्री नितीन राऊत ( Minister Nitin Raut ) यांनी वणी येथील कार्यक्रमात बोलताना ( Nitin Raut On Hedgewar ) केला. 'यांनीच जाती- जातीत भांडण तंटे उभे केले. आता तेच गुलाम लोकं आज शिकवायला निघालेत. सरसंघचालक हेडगेवार यांनी 1930 मध्ये यवतमाळ जिल्ह्यात जंगल सत्याग्रह ( Jungle Satyagrah ) केला. आता करळगाव येथील जंगलात संग्रहालय उभारण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर ऊर्जामंत्री राऊत यांनी वक्तव्य केल्याने ( Nitin Raut Controversial Statement ) नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
Last Updated : Jan 25, 2022, 3:13 PM IST