Video : मुळा धरण तिरंग्याच्या रंगसंगतीत विद्युत रोषणाईने नटले
अहमदनगर - राहुरी तालुक्यातील मुळा धरणाच्या 11 विसर्गाच्या दरवाजातील पाण्यातील विद्युत रोषणाईचा अप्रतिम देखावा पाहायला मिळत आहे. रंगीबिरंगी अनोखा अंदाज पाहण्यासाठी तालुक्यातील नागरिक या ठिकाणी मोठी गर्दी करत आहे. मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये गेली दोन-तीन दिवसांपासून सातत्याने पाऊस सुरू आहे. त्यामुळे मुळा धरणात पाण्याची आवक वाढत असल्याने धरणातील पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणाच्या दरवाज्यातून पाणी मुळा नदी पात्रात सोडण्यात आले आहे. माजी खासदार प्रसादराव तनपुरे यांच्या संकल्पनेतून पाटबंधारे विभागाने या 11 दरवाजांवर विद्युत रोषणाई केली आहे. या विद्युत रोषणाईचे खास वैशिष्ट्य म्हणजे आपल्या भारतीय झेंड्यामध्ये जे तीन रंग आहेत. तिचं रंगसंगती साधत हि रोषणाई करण्यात आली आहे. ही मनमोहक दृश्यचा परिसरातील नागरिक आनंद लुटत आहे.