VIDEO: अन् 'त्या' मद्यधुंद चालकाने पुराच्या पाण्यात घातली गाडी, पाहा... पुढे काय घडलं
कोल्हापूर - गेल्या चार दिवसांपासून बंद असलेल्या पुणे-बंगलोर महामार्ग आज सुरू करण्यात आला आहे. मात्र एका मद्यधुंद चालकामुळे या महामार्गावर आज दुपारी थरार पाहायला मिळाला. महामार्गावर पाणी नसल्याने एका बाजूने वाहतूक सुरू करण्यात आली आहे. तर दुसऱ्या लाईनवर पाणी असल्याने त्या ठिकाणची वाहतूक बंद आहे. मात्र एका मद्यधुंद चालकाने पाणी असलेल्या लाईनवरून कार घातल्याने पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. पोलिसांनी आरडाओरडा करताच मद्यधुंद चालकाने गाडी पुराच्या पाण्यात घातली. मात्र तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. पोलिसांनी पाठलाग केला. त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनाही न जुमानता या चालकाने गाडी पुराच्या पाण्यातून पुढे घातली. मात्र पुढे गेल्यानंतर हा चालक पोलिसांच्या जाळ्यात सापडला. ही सर्व दृश्य ईटीव्ही भारताच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.