कोरोना विषाणूंशी लढण्यासाठी जे.जे. रुग्णालयाचे सैनिक सज्ज - डॉ. संजय सुरासे - कोव्हीड १९
मुंबई - जेव्हा एखादी युद्ध परिस्थिती निर्माण होते तेव्हा आपले सैन्य कोणत्याही परिस्थितीत स्वतःचा विचार न करता लढाईसाठी तयार असतात. त्याचप्रकारे आमचे डॉक्टर, रुग्णसेवक, रुग्णसेविका, परिचारिका या कोरोना विषाणूंशी लढण्यासाठी तयार आहोत असे सांगत या विषाणूवर काम करणाऱ्या डॉक्टरांचे मनोबल जेजे रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संजय सुरासे यांनी वाढवले आहे. त्यांच्याशी बातचीत केली 'ईटीव्ही भारत'चे प्रतिनिधी अल्पेश करकरे यांनी...