'आम्ही फोन टॅपिंगचे आदेश दिले नाहीत, चौकशी करून सत्य बाहेर आणा' - भाजप
नागपूर - भाजप-शिवसेनेचे सरकार असताना तत्कालीन विरोधी पक्षात असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांसह खासदार संजय राऊत यांचाही फोन टॅप करण्यात आल्याचा आरोप होत आहे. याबाबत बोलताना, गेल्या पाच वर्षात कोणत्याही राजकीय कार्यकर्त्यांचे किंवा विरोधी पक्षाच्या कोणत्याही नेत्याचे 'फोन टॅपिंग' करण्याचे कोणतेही आदेश आम्ही दिलेले नाहीत. सरकारने याबाबत चौकशी करून त्याचा अहवाल राज्याच्या जनतेपुढे ठेवावा असे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.