महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Amravati Violence : शहरात इंटरनेट सेवा बंद तर परतवाडा, तिवसा आणि अचलपूरमध्ये संचारबंदी लागू - परतवाडा, तिवसा आणि अचलपूरमध्ये संचारबंदी लागू

By

Published : Nov 14, 2021, 10:28 AM IST

अमरावती - भाजपाने शनिवारी अमरावती बंदची हाक दिली होती. या बंद दरम्यान शहरातील राजकमल चौकातून निघालेल्या मोर्चेकऱ्यांनी दगडफेक करीत काही दुकानांना लक्ष्य केले. तोडफोड व जाळपोळही केली. त्यांना अटकाव करण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज व अश्रुधुराचा वापर केला. एवढेच नाही, तर येथील चांदणी चौक भागात दोन समुदायांचे गट आमने-सामने आले होते. त्यामुळे पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. भाजपा जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी यांनी आज पुन्हा ग्रामीण भागात बंदचे आवाहन केले. या बंदला सकाळपासून उस्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे. जिल्ह्यातील परतवाडा, अचलपूर व तिवसा येथे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच खबरदारी म्हणून अमरावती शहरात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. सकाळपासून अमरावतीच्या ग्रामीण भागात पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे. या सर्व परिस्थितीचा तिवसा येथून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी स्वप्नील उमप यांनी...

ABOUT THE AUTHOR

...view details