कोल्हापुरातील कोविड सेंटरमध्ये शिवराज्याभिषेक दिन साजरा - kolhapur district news
कोल्हापूर - आज सर्वत्र मोठ्या उत्साहात शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. कोल्हापुरातील एका कोविड सेंटरमध्येही शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. कोल्हापुरातील पाचगाव-गिरगाव रोड शेजारीच संभाजी ब्रिगेडने उभारलेल्या कोविड सेंटरमध्ये हा शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. यावेळी शाहीर सदाशिव निकम यांनी पाहाडी आवाजात गायलेल्या स्फूर्तिदायी पोवाड्याचे कार्यक्रमही पार पडले.