जनता कर्फ्यू : जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद, रस्त्यांवर शुकशुकाट - coronavirus in india
उस्मानाबाद - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी २२ मार्च रोजी जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. या बंदला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील बस, रिक्षा इत्यादी कर्फ्यूमुळे बंद असल्याने रस्ते ओस पडले होते. नागरिकांनी बाहेर पडण्यापेक्षा घरी राहणेच पसंत केले.