पंधरा दिवसात कामावर घ्या; अन्यथा राज्यव्यापी आंदोलन, परिचरिकांचा सरकारला इशारा
यवतमाळ - कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत जीवाची पर्वा न करता काम करणाऱ्या आरोग्य विभागातील परिचरिकांना राज्य सरकारने कामावरून कमी केले. त्यांच्या पैकी 21 परिचारिका 10 ते 12 वर्षांपासून काम करत होत्या. राज्यातील 597 परिचारिकांना अशा पद्धतीने कमी केले आहे. त्यामुळे त्यांना कामावर रुजू करून घ्यावे, असा इशारा महाराष्ट्र राज्य नर्सेस व आरोग्य संघटनेने दिला आहे. तसेच पंधरा दिवसात शासनाने हा निर्णय न बदलल्यास राज्यभर आंदोलन करण्यात येईल. त्यामुळे पुढील कोरोनाच्या काळात आरोग्य सेवा कोलमडल्यास यास शासन जबाबदार राहणार असल्याचेही संघटनेने यावेळी स्पष्ट केले आहे. आरोग्य विभागाने 375 परिचारिकांना कोरोनाच्या काळात कंत्राटी पद्धतीने कामावर घेतले होते. त्यासर्वांची आता सेवा समाप्ती केली आहे. त्यामुळे आता याचा परिणाम आरोग्य विभागावर होणार असून कामाचा ताण वाढणार आहे. कामावरून कमी केलेल्या कंत्राटी परिचरिकेंना वेतन ही दिल्या गेलं नाही. याशिवाय कुठलीही पूर्व सूचना न देता त्यांची सेवा समाप्त केली. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी राज्यसरकार विरुद्ध प्रचंड संताप व्यक्क केला आहे. तसेच या निर्णयामुळे आरोग्य विभागावरील कामाचा ताण देखील वाढणार आहे.