तीन दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यात संततधार, तर पाच तालुक्यांत अतिवृष्टी - यवतमाळ जिल्ह्यातील बातम्या
यवतमाळ - मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. तर, आज सकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे. जिल्ह्यातील कळंब दारवा डिग्रस महागाव आणि झरीजमणी या ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. जिल्ह्यात मागील 24 तासांत 43.7 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.