'ईटीव्ही भारत' विशेष मुलाखत: 'मुंबईतील कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर जाण्यासाठी शिवसेना जबाबदार' - sanjay nirupam on corona
मुंबई - महाराष्ट्रातील महामारीचा वाढता विळखा आणि प्रशासनाचे कार्य याबाबत काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी 'ईटीव्ही भारत'ला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी राज्यातील तसेच देशभरातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यात दोन्ही सरकारांना अपयश आल्याची टीका केली. तसेच काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राजकारणात कामगार वर्ग भरडल्याची भावना व्यक्त केली.