अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी विशेष : 'ये आजादी झूठी है, देश की जनता भूखी है' असे अण्णा म्हणालेच नाही - कॉम्रेड सुबोध मोरे
ठाणे - कोणत्याही महापुरुषाच्या निर्वाणानंतर त्यांच्याबाबत अनेक दंतकथा समाजात, माध्यमात आणि नंतर लिखित स्वरुपातही प्रसारित होत जातात. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याबाबतही अशा अनेक कथा प्रसारित करण्यात आल्या आहेत. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 16 ऑगस्टला अण्णाभाऊंनी मुंबईच्या आझाद मैदानावर मोर्चा काढला आणि 'ये आजादी झूठी है, देश की जनता भूखी है' अशा घोषणा दिल्याचे सांगितले जाते. मात्र, अण्णाभाऊंनी असे काहीही केले नव्हतं, अशी मांडणी विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे माजी सरचिटणीस कॉम्रेड सुबोध मोरे सातत्याने करत आले आहेत. अण्णाभाऊ साठेंच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने 'ईटीव्ही भारत'ने 'जग बदल घालूनी घाव' या मालिकेच्या माध्यमातून त्यांच्याशी संवाद साधला. पाहूयात, ते काय म्हणाले...
Last Updated : Aug 1, 2020, 2:12 PM IST