ये वक्त वक्त की बात है, वक्त सबका बदलता है…! नांदेडमध्ये छगन भुजबळांची तोफ धडाडली
'ये वक्त वक्त की बात हैं, वक्त सबका बदलता हैं, आज तेरा हैं, कल मेरा होगा… अशा शायराणा अंदाजात राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी देगलूर पोट निवडणुकीत ईडीच्या कारवायांवरूनही भाजपावर हल्लाबोल केला. देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. भाजपा नेत्यांसह महाविकास आघाडीचे नेतेही देगलूरमध्ये ठाण मांडून आहेत. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीही शुक्रवारी देगलूरमध्ये जाऊन काँग्रेस उमेदवाराचा प्रचार केला.