मध्य रेल्वेची वाहतूक अजूनही विस्कळीत
मुंबई - मुंबईमध्ये गुरुवार रात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. आता पावसाने विश्रांती घेतली असली तरी सखल भागात पाणी साचले आहे. अनेक रस्ते पाण्याखाली गेला आहे. रेल्वे लोकल वाहतूक देखील पूर्णपणे ठप्प झाली आहे. मध्य, हार्बर रेल्वेची वाहतूक मंदावली आहे. मध्य रेल्वेच्या जलद मार्गावरील लोकल अजूनही बंद आहेत. घाटकोपर ते भांडुप पर्यंत एकामागे एक लोकल उभ्या असलेल्या बघायला मिळत आहेत. शुक्रवार सकाळपासून मुसळधार पाऊस पडल्याने लोकल बंद झाल्याचे मध्य रेल्वेने सांगितले आहे. मात्र, यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. अनेक प्रवासी हे लोकलमधून उतरून ट्रॅक वर चालत जाताना बघायला मिळत आहेत. या ठिकाणचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय गायकवाड यांनी.