पहिले दाऊदचा बाप काढायचे, मग नवाज शरीफचा, आता हिंदुत्व गेल्याने आमचा बाप काढावा लागतो..
औरंगाबाद - दसरा मेळाव्यात म्हणतात रावसाहेब दानवेचा बाप दिल्लीत असेल, आमचा मुंबईत आहे. पहिले दाऊदचा बाप काढत होते, मग नवाज शरीफचा काढला आता हिंदुत्व गेलं, म्हणून आता आमचे बाप काढावे लागत आहेत, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा दानवे यांनी समाचार घेतला. उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात दानवेंवर टीका केली होती, त्याला आज दानवे यांनी प्रतिउत्तर दिले.