मुंबईला पाणीपुरवठा करण्यासाठी लॉकडाऊनमध्येही कर्मचारी 'ऑनड्युटी २४ तास' - लॉकडाऊन परिणाम
मुंबई - शहरातील पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी कर्मचारी २४ तास कार्यरत आहेत. शहरातील ताडदेव परिसरात पाणी पुरवठा करणाऱ्या ब्रिटिशकालीन जलवाहिनीत बिघाड झाला होता. त्यामुळे पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तब्बल दोन तास अथक परिश्रम करून वाहिनीतील बिघाड दुरुस्त केला. या कर्मचाऱ्यांशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी सचिन गडहिरे यांनी...