महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

सरकारविरुद्ध आंदोलन उभारून शेतकऱ्यांना मदत करण्यास भाग पाडू - संजीव रेड्डी - संजीव रेड्डी लेटेस्ट न्यूज

By

Published : Oct 30, 2021, 9:52 AM IST

यवतमाळ - अतिवृष्टी व परतीच्या पावसामुळे शेतकर्‍यांच्या सोयाबीन, कपाशी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी वणी तालुक्यात दौरा करून पिकांचा आढावा घेत नुकसान भरपाईची मागणी राज्य सरकारकडे केली होती. महाविकास आघाडी सरकारने नुकसानग्रस्त शेतकर्‍यांसाठी मदतीची घोषणा केली. परंतु, दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असताना दमडीही शेतकर्‍यांच्या खात्यात जमा झालेली नाही. केवळ सत्तेच्या लालसेपोटी तिन्ही पक्ष एकत्र आले आहे. राज्य सरकारकडून मदत न मिळाल्याने शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या वतीने या शासनाच्या विरुद्ध तीव्र आंदोलन उभारून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यासाठी भाग पाडणार असल्याची माहिती वनी मतदारसंघाचे आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details