'त्या' व्हिडिओवरून निलेश राणेंनी साधला खासदार विनायक राऊत यांच्यावर निशाणा - निलेश राणे लेटेस्ट बातमी
रत्नागिरी - लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय मंत्री नारायण राणे अडखळल्याने त्यांचा व्हिडिओ शिवसेनेने व्हायरल केला होता. यानंतर माजी खासदार, भाजपा प्रदेश सरचिटणीस निलेश राणे यांनी ( BJP Leader Nilesh Rane ) शिवसेनेचे खासदार विनायक राऊत ( Shivsena MP Vinayak Raut ) यांच्यावर टीका केली आहे. शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी लोकसभेत केलेल्या भाषणाची टिंगल करत निलेश राणेंनी राऊत यांच्यावर निशाणा साधला. ( Nilesh Rane Criticized MP Vinayak Raut ) ते म्हणाले, अर्धे मराठी आणि अर्धे हिंदीतून बोलून तुूम्ही कोकणाची आणि महाराष्ट्राची मान खाली घातली. तुम्ही कधी मंत्री झालात का? शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तुम्हाला कधी मंत्री केले आहे आहे का? असा सवाल त्यांनी विनायक राऊत यांना केला.